गाईमध्ये या कंपनीने विकसित केल्या करोना अँटीबॉडीज

फोटो साभार वर्ल्ड न्यूज ग्रुप

करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभर विविध कंपन्या आणि संशोधक लस निर्मिती साठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकन बायोटेक कंपनी सबथेराप्युटीक्सने जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या गाईच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित करण्यात यश मिळविले आहे. सार्स कोविड २ विरुद्ध या अँटीबॉडीज उपयुक्त ठरणार आहेत. याची क्लिनिकल चाचणी करण्याची तयारी झाली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्या तर करोनावर उपचार सहज शक्य होणार आहे.

या गाई एका महिन्यात शेकडो लोकांवर उपचार करता येतील इतक्या अँटीबॉडीज बनवू शकतात. प्लाझ्मा उपचारापेक्षा चार पट या अँटीबॉडीज अधिक गुणकारी आहेत. अश्या अँटीबॉडीज प्रयोगशाळा किंवा तंबाखूच्या रोपातही बनू शकतात. गेली २० वर्षे यावर संशोधन सुरु आहे.

कंपनीचे सीएओ एडी सुलीवन या संदर्भात म्हणाले गाईमध्ये मुळातच मानवी रक्ताच्या तुलनेत दुप्पट अँटीबॉडीज असतात. शिवाय गाई अनेक प्रकारच्या पॉलीक्लोनल अँटीबॉडीज बनवू शकतात. कंपनीने या अँटीबॉडीज गाईंच्या पायाच्या खालच्या भागात विकसित केल्या आहेत. या विषाणूच्या विविध भागांवर हल्ला चढविण्यास सक्षम आहेत. विशेष म्हणजे यापासून बनणारी लस प्रतिबंधक म्हणून तसेच एखाद्याला रोगाची लागण झाल्यावर उपचार म्हणूनही वापरता येणार आहे.

Leave a Comment