एलियन्स? न्यूजर्सी मध्ये दिसले रहस्यमयी लाल लाईट

फोटो साभार एनबीसी

अमेरिकेसह जगाच्या अनेक भागात गेले काही दिवस अजब प्रकाश दिसत असून नागरिक या उडत्या तबकड्या असाव्यात या दहशतीखाली आले आहेत. जगभरात करोनाच्या प्रकोपामुळे अगोदरच भीतीचे वातावरण असताना हा रहस्यमयी प्रकाश त्यात भर घालतो आहे. सोशल मीडियावर एलियन्स संदर्भातल्या बातम्यांना पूर आला असतानाच न्यू जर्सी मध्ये गेले काही दिवस असाच लाल रंगाचा प्रकाश दिसू लागला आहे. जगभरातून विविध प्रदेशातून विचित्र आकाराच्या वस्तू दिसत असल्याचे व्हिडीओ शेअर होत आहेत. न्यू जर्सी मध्ये त्रिकोणी आकारात दिसत असलेले हे लाल प्रकाश ठिपके मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले गेले आहेत.

डेली स्टारच्या बातमीनुसार हा मोबाईलवर रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ सर्वप्रथम ब्रायन नावाच्या व्यक्तीने रेडिट वर शेअर केला आहे. त्यात तीन लाल रंगाचे झोत एकत्र किंवा एकच वस्तूचे तीन कोन असल्याच्या आकारात वेगाने जाताना दिसत आहेत. यापूर्वी व्हर्जिनिया येथे असेच प्रकाश बिंदू दिसले होते. २१ एप्रिल रोजी टेक्सास व्हर्जिनियाच्या रिचमंड शहरात, लास वेगास येथेही असाच प्रकाश दिसला होता. १९ मे रोजी सायबेरिया येथील आकाशात असाच प्रकाश दिसला होता. तो इतका प्रखर होता की दिवसाचा उजेड पडला आहे असे वाटत होते.

एलियन्स पृथ्वीवर येत आहेत अश्या अनेक बातम्या आणि त्याला पुरावा म्हणून युएफओ चे विविध ठिकाणचे फोटो, विविध रंगाच्या प्रकाश रेखा सोशल मिडियावर सध्या वेगाने व्हायरल होऊ लागल्या आहेत.

Leave a Comment