व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हा आढळला बग, कोट्यावधी युजर्सचे मोबाईल नंबर धोक्यात

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बग आढळला असून, हजारो युजर्सचे मोबाईल नंबर गुगल सर्चमध्ये दिसत आहेत. सायबर सिक्युरिटी रिसर्चर अतुल जयराम यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. या बगमुळे 29 ते 30 हजार व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे मोबाईल नंबर प्लेन टेक्स्ट फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. ज्यामुळे कोणीही इंटरनेट युजर याचा वापर करू शकते.

Image Credited – Business Insider

रिसर्चरने स्पष्ट केले की, या बगमुळे अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह सर्वच देशांचे युजर्स प्रभावित झाले आहेत. बगमुळे युजर्सचा डेटा ओपन वेबमध्ये उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे याचा वापर करणे सोपे आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लिक टू चॅट या फीचरमुळे युजर्सचे मोबाईल नंबर धोक्यात आले आहेत. ज्यामुळे कोणताही सामान्य इंटरनेट युजर देखील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या मोबाईल नंबरला सर्च करू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी फेसबुकने स्पष्ट केले आहे की, ही मोठी गोष्ट नाही. गुगल सर्चमध्ये तेच रिझल्ट्स आहेत ज्यात युजर्सने स्वतःला पब्लिक करण्यासाठी सिलेक्ट केले आहे.

Image Credited – livemint

क्लिक टू चॅट फीचरमुळे युजर्स कोणत्याही वेबसाईटवर व्हिजिटर्ससोबत चॅटिंग करू शकतात. हे फीचर क्यूआर कोड इमेजद्वारे काम करते. या फीचरद्वारे कोणत्याही लिंकवर क्लिक करून चॅटिंग करता येते. रिसर्चर जयरामचे म्हणणे आहे की, या फीचरमुळे मोबाईल नंबर देखील गुगल सर्चमध्ये आढळतो. याचे कारण म्हणजे सर्च इंजिन क्लिक टू चॅटचा मेटा डेटा लोकांच्या फोन नंबर यूआरएलसोबत दिसतात.

Leave a Comment