अनलॉक 1; अनलॉकमध्ये पुण्यासाठी ‘ही’ आहे नवीन नियमावली


पुणे : केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात 30 जूनपर्यंत म्हणजेच आणखी एका महिन्याची वाढ केली आहे. पण अनेक नियम व अटी या कालावधीत शिथिल करण्यात येणार आहेत. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून अनेक नियम व अटी या पाचव्या टप्प्यात शिथिल होत असल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे अनलॉक 1 असे नामकरण करण्यात आले आहे.

त्यातच आता पुण्यातही प्रशासनाकडून अनलॉक 1साठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी २ जून रोजी काढलेल्या आदेशात तीन टप्प्यात शहरात अटींसह शिथिलता देण्यास मान्यता दिली होती. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार या लॉकडाऊनमध्ये ८ जून म्हणजे आजपासून खाजगी कार्यालये त्यांच्या कर्मचारी संख्येच्या जास्तीत जास्त १० टक्केपर्यंत उपस्थितीत सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे़ याचबरोबर आजपासून वर्तमानपत्रांचे घरपोच वितरण करण्यास (वर्तमानपत्र घेणाऱ्या व्यक्तीच्या सहमतीने) परवानगीही देण्यात आली आहे.

पुण्यात आजपासून सुरु होत आहे या गोष्टी :

  • खाजगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह, तर लग्न समारंभ ५० व्यक्तींमध्ये आणि अंत्यसंस्कार अनुषंगिक कार्यक्रम २० व्यक्तीसह करण्यास मान्यता दिली आहे.
  • अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय, माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती व पॅकेजिंगकरिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, दालमिल, अन्न प्रक्रिया उद्योग, घरकाम करणाऱ्या व्यक्ती जर घर मालकाची इच्छा असेल तर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस, वर्तमानपत्रे वितरण व स्टॉल्सला परवानगी
  • वित्तीय क्षेत्र, ई-कॉमर्स (घरपोच वस्तूंचे वितरण), माहिती तंत्रज्ञान (माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय)
  • खाद्य पदार्थ सेवा (खाद्यपदार्थ पार्सल सेवा)
  • बांधकाम विषयक (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बाहेरील मजूर न आणता कामाच्या ठिकाणी मजूरांच्या राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशा बांधकाम प्रकल्पांना मान्यता)
  • मेट्रोची कामे करण्यास मान्यता
  • धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई

पुण्यात या गोष्टींना अजून परवानगी नाही :

  • शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या इ़, सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे व या अनुषंगिक ठिकाणे
  • सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम आणि कोणतेही कारणाने होणारी मोठी गर्दी़
  • सर्वसामान्य व्यक्तींसाठी असलेली धार्मिक स्थळे, केशकर्तनालय / ब्युटी पार्लर, स्पा़, मॉल, हॉटेल, उपहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाऱ्या सेवा.

Leave a Comment