पाकिस्तानच्या सरकारी चॅनेलने मान्य केले काश्मिर भारताचा भाग, मागावी लागली माफी

जम्मू-काश्मिर पाकिस्तानाचा भाग असल्याचा दावा अनेकदा पाकिस्तानकडून केला जातो. मात्र आता पाकिस्तानच्या सरकार टिव्ही चॅनेल पीटीव्हीनेच काश्मिर हा भारताचा भाग असल्याचे मान्य केले आहे. सरकारी टिव्हीवर काश्मिर भारताचा भाग दाखवल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. आता पीटीव्हीने यावर स्पष्टीकरण देत या संदर्भात दोषींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

पीटीव्हीने म्हटले की, पीटीव्ही व्यवस्थापनाने मानवी चुकीमुळे पाकिस्तानचा चुकीचा नकाशा दाखवल्या संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. पीटीव्हीचे एमडी म्हणाले की, त्यांची संस्था अशा प्रकारच्या गुन्ह्यांना माफ करण्यासारखे मानत नाही.

पाकिस्तानने कोरोना व्हायरससाठी बनवण्यात आलेल्या वेबसाईटवर पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग दाखवले होते. सोशल मीडियावर या नकाशाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर पीटीव्हीला या चुकीसाठी सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.