सीमेवरील तणावावरून ओवेसी यांचा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न


हैदराबाद – लडाखमधील सीमेवरून भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान भारत आणि चीनदरम्यान लष्कराच्या पातळीवर काही दिवसांपूर्वी चर्चा देखील करण्यात आली. त्यानंतर यापुढेही शांततापूर्ण मार्गाने चर्चा सुरू राहणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयानेही म्हटले होते. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ओवेसी यांनी मोदी सरकारला चीनसोबत आपली कोणती चर्चा झाली, याची माहिती सरकारने द्यायला हवी. ते शांत का आहेत? असा सवाल केला आहे.

आपला प्रदेश चीनने जर बळकावला नाही, तर त्यांच्याशी सरकार काय चर्चा करत आहे. याची माहिती देशाला मिळाली पाहिजे. याबाबत केंद्रातील मोदी सरकारने माहिती द्यायला हवी. हे सरकार शांत का आहे? असे ओवेसी म्हणाले. दरम्यान ओवेसी यांनी यावेळी कोरोनाच्या संकटावरही भाष्य केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लागू केलेला लॉकडाउन सपेशल अयशस्वी झाला आहे. देशात आजच्या घडीला तीन लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आहेत. गुजरातची परिस्थितीही खराब असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान देशभरातील अनेक ठिकाणी आजपासून अनलॉक १ ची सुरूवात झाली आहे. लोकांनी या काळात आपली काळजी घ्यावी असे ओवेसी म्हटले आहे. त्याचबरोबर हैदराबादमधील सर्वच धार्मिक स्थळांना सॅनिटाझर डिस्पेन्सिंग मशीन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून स्वत:ला सुरक्षित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन लोकांनी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकांनी सतत हातही धुत राहावे. कोरोना म्हणजे कोणता सामान्य आजार नसून त्याला गंभीरतेने घेतले पाहिजे. जर आपल्यात त्या आजाराची लक्षणे आढळून आली तर आपण थेट रूग्णालयातही गेले पाहिजे, असे ओवेसी म्हणाले.

Leave a Comment