निदर्शनानंतर मुलाने केली 10 तास साफसफाई, तर लोकांनी बक्षीस दिली गाडी आणि स्कॉलरशीप

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर निदर्शन सुरू आहेत. लोक बोर्ड, कागद, पॅम्पलेट घेऊन विरोध नोंदवत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने मन जिंकून घेणारे काम केले. लोक निदर्शन करून घरी निघून जातात व मागे कचरा सोडतात. मात्र अँटोनियो ग्वॅयन ज्यूनियरने निदर्शनानंतर 10 तास कचरा साफ करण्याचे कार्य केले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी त्याला खास इनाम देखील मिळाले.

अँटोनियोने न्यूयॉर्कमध्ये 10 तास निदर्शनादरम्यान झालेला कचरा उचलला.  दुसऱ्या दिवशी भागातील लोक सफाई करण्यासाठी आले, त्यावेळी उचललेला कचरा पाहून हैराण झाले. 18 वर्षीय अँटोनियो हाय स्कूलमध्ये शिकतो. त्याने सांगितले की, रस्त्यावर कचरा, प्लास्टिकचे ग्लास पडल्याचे बघितले होते. दुसऱ्या दिवशी लोक तेथूनच कामाला जाणार होते. म्हणून त्याने स्वतःच सर्व कचरा उचलला.

Image Credited – Fox8

मॅट ब्लॉक नावाच्या एका व्यक्तीला जेव्हा बातम्यांद्वारे याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने अँटोनियोला त्याच्या कामासाठी एक कार भेट दिली. त्याने 2004 चे मस्टँग कन्व्हेर्टेबल मॉडेल त्याला भेट दिले. अँटोनियाने सांगितले की, त्याच्या आईकडे देखील अशीच कार होती. 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर उद्योगपती बॉब ब्रिसलँडने स्वतः कारचा विमा वाढवून दिला.

मेडियल कॉलेज, बफेलोने अँटोनियोला मोफत स्कॉलशीप देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता अँटोनियोला आपले शिक्षण कमी खर्चात पुर्ण करता येईल.

Leave a Comment