देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लाखो लोकांना क्वारंटाईन देखील करण्यात आले आहेत. अनेक लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहे. येथील लोकांमध्ये एकप्रकारे कोरोनाची भिती देखील असते. अशाच लोकांचे मनोरंजन करण्यासाठी व त्यांची चिंता काहीवेळासाठी दूर करण्यासाठी बिहारच्या क्वारंटाईन सेंटरमधील एका व्यक्तीने चक्क ‘एक चतूर नार’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. हे गाणे 1967 साली आलेल्या ‘पडोसन’ या चित्रपटातील आहे.
व्हिडीओ : क्वांरटाईन सेंटरमध्ये या व्यक्तीने केला ‘एक चतूर नार’ गाण्यावर भन्नाट डान्स
व्यक्तीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बनियान आणि धोती घालून व्यक्ती अगदी जबरदस्त डान्स करत आहे. तो अभिनेते महमूद यांची हुबेहुब नक्कल करण्याचा देखील प्रयत्न करतो. क्वांरटाईनमधील इतर लोक देखील टाळ्या वाजवून त्यांच्या डान्सला दाद देत आहेत. युट्यूबवर या व्हिडीओला आतापर्यंत 9 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, लोक त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत.