व्हिडीओ : चक्क टोळला करायला लावली नांगरणी

टोळधाडमुळे देशातील शेतकरी चिंतेत आहे. या टोळधाडीमुळे मोठ्या प्रमाणांत पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र आता पिके नष्ट करणाऱ्या या टोळचा चक्क नांगर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिके नष्ट केल्यामुळे या टोळला नांगरणी करण्याची शिक्षा देण्यात आलेली आहे.

https://twitter.com/upcoprahul/status/1269870613411266562

या व्हिडीओला उत्तर प्रदेशचे एसपी राहुल श्रीवास्तव यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, प्रिय टोळ, तुम्ही आमच्या पिकांना नुकसान पोहचवले तर आम्ही तुमच्याकडून नांगरणी करून घेऊ.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडत आहे. या व्हिडीओतापर्यंत 5 हजार पेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment