कोरोना व्हायरस लॉकडाऊनचे नियम शिथिल करत सरकारने अनलॉक 1.0 मध्ये 8 जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली आहे. अनेक प्रमुख मंदिरे अद्याप बंदच आहेत. मात्र जी धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत, तेथे सोशल डिस्टेंसिंगची काळजी घेतली जात आहे.
अनलॉक 1.0 : आजपासून उघडली धार्मिक स्थळे, अशा प्रकारे घेत आहेत काळजी

उत्तर प्रदेशमध्ये अयोध्यासह अनेक जिल्ह्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील गोरखपूर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
दिल्लीची जामा मशिदचे दरवाजे नागरिकांसाठी उघडण्यात आले. मात्र सरकारने दिशानिर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे.
अयोध्यामधील प्रसिद्ध हनुमान गढी मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आल्यानंतर नागरिक दर्शनासाठी येऊ लागले. हे उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध मंदिर आहे. सामान्य दिवसात येथे दररोज शेकडो भाविक येतात.
दिल्लीतील झंडेवालान मंदिर देखील भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांनी नियमांचे पालन करत दर्शन घेतले.
मंदिरे उघडल्यानंतर अधिकारी आणि मंदिर प्रशासन मोजक्याच लोकांना प्रवेश देत आहेत. सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्हावे यासाठी मर्यादित संख्येत भाविकांना प्रवेश दिला जात आहे.
अनेक मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश देण्याआधी थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

लखनऊमधील प्रसिद्ध यहियागंज गुरुद्वारा दोन महिन्यानंतर उघडल्यानंतर शीख बांधवांनी माथा टेकवला.