जीएसआयला या राज्यात सापडला तब्बल 250 किलो सोन्याचा खजिना

खनिज संपन्न झारखंडमध्ये पुन्हा एकदा सोन्याची खाण सापडली आहे. हा खजिना राज्याच्या पुर्व सिंहभूम जिल्ह्यात सापडला आहे. या आधी राज्यात 4 वेळा सोन्याचा खजिना सापडलेला आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने माहिती दिली की, 250 किलो सोने भीतर डारी गावात सापडले आहे. हे जमशेदपूर पासून दक्षिणेला 20 किमीवर आहे. याबाबत राज्य खाण विभागाला रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. आता सोन्याच्या खाणीचा लिलाव जाणार आहे.

राज्य खाण विभागातील भूशास्त्र यूनिटच्या संचालक कुमारी अंजली यांनी सांगितले की, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने आम्हाला जी3 लेव्हल रिपोर्ट दिला आहे. याचा अर्थ या खाणीचा थेट लिलाव करता येणार नाही. त्या आधी अजून काही शोध आणि कामे करण्याची गरज आहे. सध्या रिपोर्टचा अभ्यास करत असून, त्यानुसारच पुढील निर्णय घेऊ.

झारखंडमध्ये सापडलेली ही 5वी सोन्याची खाण आहे. याआधी पारासी आणि पहाडिया येथील खाणींचा लिलाव करण्यात आला होता. तर कुंडरकोचा आणि लावा येथील खाणीत उत्खननाचे काम सुरू आहे.

भीतर डारी गावातील हा साठा रांची भागातील भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे संचालक पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखालील टीमने शोधला आहे. ते 2013-14 पासून येथे काम करत होते.

Leave a Comment