कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनुष्यापासून मनुष्याला या व्हायरसचा संसर्ग होत होता. मात्र आता प्राण्यांपासून मनुष्याला संसर्ग झाल्याची घटना झाली आहे. हा प्राणी मिंक (तपकरी रंगाचे केस असणारा लहान प्राणी) आहे. नेंदरलँड्समध्ये या प्राण्यामुळे दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता येथील सरकारने देशातील 10 हजारांपेक्षा अधिक मिंक प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
या प्राण्यापासून मनुष्याला कोरोनाची लागण? सरकारने दिले या 10 हजार प्राण्यांना मारण्याचे आदेश
नेदरलँड्सच्या 10 फार्म्समध्ये कोरोना संसर्ग झालेले मिंक आढळले आहेत. यांना मारण्याचे आदेश नेदरलँडच्या फूड्स अँड वेअर्स प्रशासनाने दिले आहेत. फूड्स अँड वेअर्सचे प्रवक्ते फ्रेडरिक हर्मी यांनी सांगितले की, मिंकचे पालन करणाऱ्या फार्म्सला सर्व कोरोनाग्रस्त जोपर्यंत सर्व मिंकला मारले जात नाही तोपर्यंत फार्म्स बंद ठेवण्यास सांगितले आहे. यांच्यामुळे लोकांना संसर्ग होऊ नये यासाठी असे केले जात आहे.

नेदरलँडमध्ये मिंकला कोरोना झाल्याचे पहिले प्रकरण एप्रिलमध्ये समोर आले होते. मे महिन्यात यांच्या संपर्कात आल्याने दोघांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर हळूहळू हे 10 फार्म्समध्ये पसरले. या प्राण्यांना मारण्यासाठी आता गॅसचा उपयोग केला जाणार आहे. यानंतर त्यांचे शव डिस्पोजल प्लांटमध्ये नष्ट केले जाईल. यानंतर फार्म आणि प्लांटची सफाई केली जाईल.

ब्रिटन ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनलचे एग्जिक्यूटिव्ह डायरेक्टर क्लेयर बास यांनी सांगितले की, आम्ही जगातील 24 देशांना मिंकची तपासणी करण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास त्यांनाही मारले जाऊ शकते. कारण यांच्यामुळे वेगाने संसर्ग पसरत आहे. नेदरलँडमध्ये 140 मिंक फार्मिंग सेंटर्स आहेत. हे दर वर्षी पुर्ण जगात याची 760 कोटी रुपयांची फर विकली जाते.