पाकिस्तानमध्ये जुगार खेळण्याच्या आरोपाखाली गाढवाला अटक, लोकांनी उडवली खिल्ली

पाकिस्तानमधील एक मजेशीर प्रकार समोर आला असून, येथे जुगार खेळण्याच्या आरोपाखाली चक्क एका गाढवाला अटक करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागात पोलिसांनी या गाढवाला अटक केले. गाढवासोबत अन्य 8 आरोपींना देखील अटक करण्यात आले आहे.

या भागातील एसएचओने सांगितले की, अन्य आरोपींसोबत गाढवाचे नाव देखील एफआयआरमध्ये होते. आरोपी गाढवाला पोलीस स्टेशन बाहेर बांधण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 20 हजार रुपये जमा केले असून, त्यांचे म्हणणे आहे की हे आरोपी गाढवांच्या शर्यतीवर पैसे लावत होते.

सोशल मीडियावर हा प्रकार चर्चेचा विषय ठरला असून, नेटकरी खिल्ली उडवत आहेत.

Leave a Comment