डब्ल्यूएचओच्या वाढल्या अडचणी, अमेरिकेनंतर आता या देशाने दिली संबंध तोडण्याची धमकी

कोरोना व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असताना माहिती लपवणे आणि त्याबाबत ठोस पावले न उचलल्याने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेबाबत अमेरिकेनंतर आता इतर देशांमध्ये देखील रोष वाढत चालला आहे. अमेरिकेनंतर आता ब्राझीलने देखील डब्ल्यूएचओशी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. ब्राझीलने डब्ल्यूएचओवर पक्षपात आणि राजकारण करण्याचा आरोप केला आहे.

Image Credited – Aajtak

ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी आरोप केला आहे की, डब्ल्यूएचओ निष्पक्ष नाही. अमेरिकेने पैसे देणे बंद केले, तसे लगेच त्यांनी दिलेले सर्व आश्वासनाकडे दुर्लक्ष केले. याआधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात अमेरिका डब्ल्यूएचओशी संबंध तोडण्याची घोषणा केली होती.

Image Credited – Aajtak

ब्राझीलने 2019 मध्येच डब्ल्यूएचओला निधी देणे बंद केले होते. डब्ल्यूएचओची ब्राझीलकडे 33 मिलियन डॉलर्सची थकबाकी आहे. दरम्यान, जगात सर्वाधिक कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या देशांमध्ये ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाखांच्या पुढे गेला आहे. तर 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment