युनिक लुकची इलेक्ट्रिक बाईक सादर

फोटो साभार नवभारत टाईम्स

इटलीच्या सोसिअनो मोतोरीने त्यांची पाहिली इलेक्ट्रिक बाईक इव्ही गीआगुरो युनिक लुक मध्ये सादर केली असून तीन व्हेरीयंट मध्ये ती उपलब्ध होणार आहे. व्ही १ आर, व्ही १ एस आणि व्ही वन गारा अशी ही तीन व्हेरीयंट आहेत. या बाईकच्या किंमती अनुक्रमे २५५०० युरो म्हणजे २१.७५ लाख रुपये, ३०५०० युरो म्हणजे २६ लाख रुपये आणि ३२५०० युरो म्हणजे २७.७३ लाख रुपये आहेत. या बाईकचे बुकिंग सुरु झाले आहे.

या बाईक निओरेट्रो डिझाईन, राउंड हेडलँप, स्लिक फेअरिंग, मोठा विंडस्क्रीन, लो सेट सीट, सिंगल सायडेड स्विंग आर्म, वाय स्पोक अलॉयव्हील्स, उच्च दर्जाच्या ब्रेकिंग पॉवरसाठी पेरिफेरल ब्रेक, गर्डर स्टाईल सस्पेन्शन अश्या फिचर्ससह आहेत. या बाईकला दोन मोटर्स दिल्या गेल्या असून ग्राहक त्याच्या गरजेनुसार जादा पॉवर साठी दोन्ही मोटरचा वापर करू शकेल अथवा एक मोटर वापरून बॅटरी वाचवू शकेल. इलेक्ट्रिक पॉवरट्रेन तीन स्पीड ट्रान्समिशनसह, ट्रॅक्शन कंट्रोल व कॉर्नरींग एबीएस अशीही फिचर्स आहेत.

ही बाईक एका फुल चार्ज मध्ये २०० किमी अंतर जाऊ शकेल असा कंपनीचा दावा आहे. या बाईकचा टॉप स्पीड आहे ताशी १८० किमी. नोव्हेंबर मध्ये झालेल्या ईकेएमए मोटर शो मध्ये ती सादर झाली आहे.

Leave a Comment