या सापाच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकेल मोठे घर

फोटो साभार फिटी क्लब

सापाची कुणी खरेदी करत असेल याचा विचार आपण करू शकत नाही. अर्थात औषधी उपयोग, अंधश्रद्धा या व अश्या अनेक कारणांनी साप खरेदी केले जातात किंवा सर्पप्रेमी साप खरेदी करतात याची माहिती आपल्याला असते. पण औषधी उपयोग नाही, अंधश्रद्धेपोटी नाही तरी केवळ आकर्षक रंगामुळे प्रचंड पैसे मोजून खरेदी केला जाणारा एक साप आहे. जगात हा सर्वात महाग साप असून त्याचे नाव आहे ‘ग्रीन ट्री पायथन’.म्हणजे वास्तवात हा अजगर म्हणता येईल. या सापाचा रंग नावाप्रमाणे हिरवा असतो पण त्यात खूप शेड आहेत. याच जातीचा एक निळा सापही आहे मात्र तो दुर्मिळ आणि म्हणून अधिक महाग आहे.

फोटो साभार फीटी क्लब

या साप किंवा अजगराच्या किंमतीत एक मोठे घर, छोटे जहाज सहज खरेदी करता येईल कारण ग्रीन ट्री पायथनची किंमत लाखात नाही तर करोडो रुपयात आहे. चार लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक किंमत या सापाला मिळते. रीचेस्ट डॉट कॉम वेबसाईटवर ही माहिती दिली गेली आहे. ग्रीन ट्री पायथन हे त्यांच्या आयुष्यातले ९० टक्के आयुष्य झाडावर घालवितात. इंडोनेशियन बेटे, न्यू गिनिया, न्यू गिनी व ऑस्ट्रेलिया मध्ये ते सापडतात.

या सापाची लांबी साधारण २ मीटर तर वजन दीड किलोच्या आसपास असते. मादी लांबीला थोडी अधिक व वजनाला थोडी जास्त असते. सर्पप्रेमी तसेच इंडोनेशियात हे साप खुपच लोकप्रिय आहेत आणि त्यामुळे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. या सापाचे आयुष्य साधारण २० वर्षाचे असते. हा साप विषारी नाही आणि तो अंडी घालतो. बहुतेक वेळा या सापांची खरेदी डिस्प्ले स्नेक म्हणूनच केली जाते.

Leave a Comment