चोरी करायला येतोय, चोराचा पत्राने इशारा

फोटो साभार नई दुनिया

अमुक दिवशी अमुक ठिकाणी चोरी करायला येतोय, शक्य असले तर पकडा असा संदेश पोलिसांना देऊन चोऱ्या करणारा धूम चित्रपटातील मधील हृतिक रोशन सर्व प्रेक्षकांना आठवत असेलच. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे अश्याच एका धूम चोराने दहशत पसरविली आहे. त्याने ९ जून रोजी परत एकदा चोरी करायला येतोय, हिम्मत असेल तर पकडून दाखवा, आपापल्या बाईक्स, कार्स सांभाळा अशी सूचना पत्राद्वारे दिली आहे. या शहराच्या वॉर्ड नंबर १९ मधील त्रिलोकी गल्ली नंबर सहाचे रहिवासी यामुळे दहशतीखाली आले आहेत.

रविवारी सकाळी वरील मजकूर असलेले एक पाकीट एका रहिवाश्याच्या घरासमोर ठेवलेले आढळले. त्यात वरील पत्र, बांगड्या आणि कंगन होते. त्याने रहिवाश्यांना आम्ही १५ जण आहोत, बाईक्स, कार्स चोरणार आहोत तेव्हा कार्स बाईक सांभाळा, कुलपे तपासा असा इशारा दिला आहे. ही त्यांची ५० वी चोरी आहे असेही चोरट्याने नमूद केले आहे. पोलिसना या संदर्भात माहिती देण्यात आल्याचे रहिवासी सांगतात.

लॉक डाऊन लागल्यापासून या भागात याच गल्लीत किमान १२ चोऱ्या झाल्या असून त्यात दागदागिने, रोकड, बाईक्स असा माल चोरीला गेला आहे. पहाटे ३ ते ५ या वेळात या चोऱ्या झाल्या होतात. रहिवाशांनी वर्गणी गोळा करून गल्लीत कॅमेरे बसविले आहेत. पैकी दोन चोर कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहेत मात्र त्याचा तपास अजून लागू शकलेला नाही असे समजते.

Leave a Comment