अंतराळ आणि पृथ्वी मध्ये होतोय बुद्धीबळ सामना

फोटो साभार चेसबेस इंडिया

रशियात उद्या म्हणजे ९ जून रोजी मंगळवारी अंतराळ आणि पृथ्वी यांच्यात बुद्धिबळाचा सामना खेळाला जाणार आहे. यात आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील अनातोली इवीनेशीन व इवान वॅगनर हे अंतराळवीर प्रथमच, पृथ्वीतर्फे खेळणाऱ्या ग्रँडमास्टर सर्गेई कार्झाकीन याच्याबरोबर हा सामना खेळणार आहेत. ९ जून १९७० मध्ये असाच एक बुद्धीबळ सामना अंतराळ स्थानक आणि पृथ्वी यामध्ये खेळाला गेला होता. त्या घटनेचा उद्या ५० वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने हा सामना खेळाला जाणार आहे.

कार्झाकीन रॅपिड आणि ब्लिट्झ चँपियन आहे. सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर बनण्याचे पाहिले रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. अनातोली इवीनेशीन व इवान वॅगनर हे अंतराळ स्टेशनवरून तर कार्झाकीन मॉस्को म्युझियम ऑफ कॉस्मोनॉटीक्स मधून टॅब्लेटवर हा सामना खेळणार आहेत. त्याचे लाईव प्रक्षेपण रशियन वेळेनुसार १२ वा. केले जाणार आहे.

या प्रकारचा सामना खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. २००८ मध्ये नासाने युएस चेस फेडरेशनच्या सहकार्याने अश्या एका सामन्याचे आयोजन केले होते त्यात पृथ्वीचा विजय झाला होता. ५० वर्षापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात सोविएत अंतराळ यान सोयुझ ९ चा पायलट कॉस्मोनॉट अँड्रीयन ग्रिगोरीविच निकोलोव्ह व विताली इवानोविच सेशियानोव्ह आणि पृथ्वीवरील निकोलाई पेगोवीच व व्हिक्टर गारबात्को याच्याबरोबर असा सामना खेळला तो अनिर्णीत राहिला होता.

या बुद्धीबळ सामन्यासाठी झिरो ग्रॅव्हीटी परिस्थितीत खेळता येईल अश्या खास बुद्धिबळाचा वापर केला जात आहे.

Leave a Comment