ट्रायने दिवसाला 100 फ्री मेसेज पाठवण्याची मर्यादा आणली संपुष्टात


नवी दिल्ली : एका सीममधून दररोज 100 एसएमएस पाठवण्याच्या FUP मर्यादा टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) संपुष्टात आणली आहे. त्याचबरोबर 100 मेसेजनंतर, पुढील मेसेजवर लागणारा 50 पैसे चार्जही बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ट्रायच्या या निर्णयामुळे आता दिवसाला 100हून अधिक मेसेज करता येऊ शकत असल्याचे सांगण्यात आले आहे. मेसेजसाठी टॅरिफच्या नियमांबाबत ट्रायने ‘टेलिकम्युनिकेशन टॅरिफ ऑर्डर 2020’चा ड्राफ्ट तयार केला आहे.
टेलिकॉम ऑपरेटर्स आतापर्यंत दररोज 100 मेसेजच्या मर्यादेनंतर प्रत्येक मेसेजसाठी कमीत कमी 50 पैसे चार्ज आकारतात. 2012मध्ये हा नियम लागू झाला होता. टेलिकॉम सब्सक्रायबर्सला UCC (अनसॉलिसिटेड कमर्शल कम्युनिकेशन्स) पासून वाचवण्यासाठी ट्रायने रोज 100 मेसेजची मर्यादा ठेवली होती.

कंपन्यांना स्पॅम एसएमएसवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्ग आणण्याबाबत ट्राय सांगत आहे. ट्रायने 2017 मध्ये UCCवर बंदी घालण्यासाठी टीसीसीसीपीआर सादर केले होते. नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्क टेक्नोलॉजीवर आधारित टीसीसीसीपीआर आहे. स्पॅम एसएमएसवर हे अंकुश लावू शकते. स्पॅम एसएमएसवर बंदी घालण्यासाठी ट्रायने 100 मेसेजनंतर त्यापुढील मेसेजवर 50 पैसे चार्ज लावला होता. हा चार्ज टीसीसीसीपीआर (टेलिकॉम कमर्शल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफेरेंस रेग्युलेशन्स) च्या रुपात लागू झाला होता. परंतु तो आता मागे घेण्यात आला आहे.

ट्रायने हा निर्णय लागू करण्यासाठी टेलिकम्युनिकेशन्स टॅरिफ ऑर्डर, 2020चा ड्राफ्ट तयार केला होता. 2012 साली यात मेसेजसंबंधी लावण्यात आलेला नियम मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. म्हणजेच दररोज 100 मेसेजनंतर त्यापुढील मेसेजवर 50 पैसे चार्ज हटवण्याचा प्रस्ताव ट्रायने दिला होता. त्यानंतर ट्रायने स्टेकहोल्डर्सकडून 3 मार्चपर्यंत लिखित आणि 17 मार्चपर्यंत काऊंटर प्रतिक्रिया मागवल्यानंतर हा निर्णय ट्रायने घेतला आहे.

Leave a Comment