सोनू सूदवर टीका करणाऱ्या राऊतांना राम कदमांचे चोख प्रत्युत्तर


मुंबई : लॉकडाऊनच्या काळात विविध राज्यात विशेषतः मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेत त्यांची घरवापसीत मोलाची मदत केली आणि तो अद्यापही मदत करत असल्यामुळे सोनू सूदचे सगळ्याच स्तरावर कौतुक होत आहे. पण सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. त्यावर संजय राऊत यांच्या आरोपांवर भाजप आमदार राम कदम यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.


‘स्वतःही करायचं नाही @Sonu Sood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचे कौतुक करायचे सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म?’ असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.


राम कदम यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरत आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे? मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या’, असे म्हणत संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.

Leave a Comment