आता इंस्टाग्रामचे फोटो वापरणे पडेल भारी; कंपनीने बदलली कॉपीराईट पॉलिसी


सोशल मीडिया जगतात आघाडीवर असलेल्या फेसबुक कंपनीच्या मालकीच्या इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवरील फोटो आपण वापरत असाल तर आता यापुढे ते वापरता येणार नाही. कारण कंपनीने यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने आपल्या नव्या नियमात हे स्पष्ट केले आहे की, थर्ड पार्टी वेबसाइट किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अन्य इन्स्टाग्राम युझर्सचे एम्बेड केलेले फोटो वापरण्यासाठी यापुढे परवानगी आवश्यक असणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला जर एखाद्या इन्स्टाग्राम युझरचा फोटो जर दुसर्‍या वेबसाइटवर एम्बेड करुन वापरायचा असेल तर त्यांनी त्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर एखाद्याने तसे न करता इंस्टाग्रामवरील फोटो दुसर्‍या साइटवर अपलोड केला, तर तो कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन ठरु शकते. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म युझर्सना इतर वेबसाइटवर एम्बेड केलेले फोटो पोस्ट करण्यासाठी कॉपीराइट परवानगी देणार नाही.

युझर्संना आतापर्यंत असा विश्वास आहे की, फोटोला थेट होस्ट करण्याऐवजी एम्बेड करणे कॉपीराइट दाव्यांविरूद्ध इन्सुलेशन प्रदान करते. पण या अहवालाचा हवाला देत फेसबुक कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्हाला आमच्या अटी सब- लायसन्स देण्यास परवानगी देतात, पण आमच्या एम्बेड एपीआयसाठी आम्ही ग्रांट देत नाही. ते पुढे म्हणाले, आमच्या व्यासपीठाच्या धोरणांमध्ये लागू असलेल्या अधिकारांना धारकांकडून आवश्यक अधिकार मिळण्यासाठी थर्ड पार्टीची आवश्यकता असते. यामध्ये कायद्यानुसार परवाना आवश्यक असल्यास त्यांना हा कन्टेन्ट शेअर करण्यासाठी परवाना सुनिश्चित करावा लागेल.

दरम्यान, न्यूयॉर्कमधील न्यायाधीशांनी आपल्या निर्णयामध्ये म्हटले होते की, इन्स्टाग्रामच्या सेवा अटींच्या आधारे फोटोग्राफरची तक्रार न्यूजविक डिसमिस करू शकत नाही. दरम्यान, आरस टेक्निकाला इंस्टाग्रामने सांगितले की, ते युझर्संकडून एम्बेडिंग नियंत्रित करण्यासाठी अधिक मार्ग शोधत आहेत. सध्या, फोटोग्राफर त्यांच्या इंस्टाग्रामवर प्रवेश मर्यादित करून केवळ फोटो खाजगी करून एम्बेडिंग रोखू शकतात.

Leave a Comment