‘अमूल’चे अकाऊंट यामुळे केले बंद, ट्विटरचा ‘यू-टर्न’


नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा प्रसार करण्यास कारणाभूत ठरलेल्या चीनविरोधात सध्या भारतातील नागरिकांची मानसिकता होत आहे. त्यातच भारतातील अग्रगण्य दुग्धपदार्थ उत्पादक कंपनी असलेल्या अमूलने त्या पार्श्वभूमीवर आपली क्रि‍एटिव्हिटी दाखवत एक भन्नाट कार्टून काढले होते. तीन जून रोजी चीनविरोधात एक कार्टून अमूलने ट्विट केले होते. पण ट्विटरने त्यामुळे त्यांचे अधिकृत अकाऊंट ब्लॉक केले. अमूलचे ट्विटर अकाऊंट बंद केल्यानंतर नेटकऱ्यांनी चीन आणि ट्विटरवर नाराजी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणी युटर्न घेत रुटीन सेफ्टी प्रोटोकॉलमुळे खाते ब्लॉक केल्याचे ट्विटरने म्हटले.

ट्विटरवर मागील दोन दिवसांपासून #AmulVsChina असा हॅश टॅग ट्रेंड होत होता. यावर नेटकऱ्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अमूलचे ट्विटर अकाऊंट पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. पण अमूलचे खाते चीनच्या संबंधित एक कार्टून ट्विट केल्यानंतर Restricted झाल्याचा मेसेज आला होता. यावर ट्विटरचे असे म्हणणे आहे की, सिक्युरिटीच्या दृष्टीने पाहिले असता त्यांची ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. तर अमूल कंपनीचे अकाउंट ट्विटरने ब्लॉक केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


तीन जून रोजी अमूल कंपनीचे क्रिटिव्ह कॅम्पेन Exit The Dragon? असे होते. चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यासंबंधित त्यामध्ये एक कार्टून पोस्ट करण्यात आले होते. About the boycott of Chinese products…असे कॅप्शनही त्याखाली लिहण्यात आले होते. लाल आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये आइकॉनिक अमूल गर्लला एका ड्रॅगनसोबत लढून वाचताना अमूलच्या कार्टूनमध्ये दाखवण्यात आले आहे. याच कार्टमध्ये बॅकग्राहउंडला चिनी व्हिडियो-शेअरिंग मोबाइल अॅप टीक-टॉकचा लोगो दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय अमूल ‘Made In India’ ब्रँड असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे.

Leave a Comment