जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपपैकी एक बनले आरोग्य सेतु


नवी दिल्ली : मे महिन्यात जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपमध्ये एक देशभरात पसरणाऱ्या कोरोनापासून बचाव करण्याबाबत माहिती देणारे आरोग्य सेतुचा समावेश झाला आहे. कोरोनाला ट्रॅक करणाऱ्या या सरकारी अॅपमुळे आरोग्य सेतुवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे. याबाबतची माहिती नीति आयोगचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.


याबाबत अमिताभ कांत यांनी ट्विट केले असून आरोग्य सेतु लॉन्च केल्यानंतर मे महिन्यात, सलग दुसऱ्या महिन्यात प्रमुख 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या मोबाईल अॅपपैकी एक बनले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाने तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करुन जगात नेतृत्व केले. 14 एप्रिल रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आरोग्य सेतु अॅप हे डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते.