जागतिक आरोग्य संघटनेने मास्कसंदर्भात जारी केली नवी मार्गदर्शकतत्वे


मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आता तोंडाला मास्क लावण्याबाबतची नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मार्गदर्शकतत्वांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन ज्या ठिकाणी होत नाही, तिथे मास्क घालणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर मास्क कसे असावेत आणि त्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात यावे याबाबतही नवीन मार्गदर्शकतत्वांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

  • तुम्ही हे मास्क घरी तयार करू शकता किंवा दुकानामधून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता.
  • हे मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या.
  • घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत.
  • हनुवटीपासून डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंत झाकणारे मास्क वापरावे.
  • हा मास्क सॅनिटाइझ करावा किंवा शक्य असेल तर धुवावा.
  • एका कपड्याचा मास्क हा कोरोनापासून बजाव करेलच हे सांगता येत नाही.
  • मास्क गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरणे आवश्यक आहे.
  • मास्क वापरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल.
  • रेल्वे, बस, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस एडहेनॉम यांनी केवळ फेसमास्कवर अवलंबून रहाणेही धोक्याचे असल्याचे मत मांडले आहे. यासाठी इतर उपाययोजना आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि इतर उपाययोजना जसे की सॅनिटायझर, योग्य आहार इत्यादी करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

Leave a Comment