मॉल-धार्मिक स्थळे उघडण्याची घाई करू नका – विशेषज्ञ

दोन महिन्यांच्या दीर्घ लॉकडाऊननंतर सरकारने नियमांममध्ये सूट देत विविध सेक्टर उघडण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीमध्ये कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा चिंतेत टाकणारा आहे. मागील एका आठवड्यात 61 हजार कोरोनाची नवीन प्रकरण समोर आली आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की जर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. सोबतच अशा स्थितीमध्ये शॉपिंग मॉल आणि धार्मिक स्थळे उघडणे अतिघाई ठरू शकते.

भारतात शुक्रवारी एका दिवसात 9 हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध फुफ्फुस सर्जन डॉ. अरविंद कुमार म्हणाले की, सध्या लोकांनी स्वतःला लॉकडाऊन करून घरात राहणे योग्य आहे. गरज नसेल तर बाहेर जाऊ नये, मास्क घालावा, वारंवार हात धुवावा आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

फोर्टीस हॉस्पिटल वसंतकुंज डॉ. विवेक नांगिया म्हणाले की, कोरोनाग्रस्तांची वाढते आकडेवारी चिंताजनक आहे. अशा स्थितीमध्ये मॉल आणि धार्मिक स्थळे उघडणे अतिघाई ठरू शकते. कारण तेथे गर्दी होईल व स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

Leave a Comment