चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केल्याने अमूलचे ट्विटर अकाउंट ब्लॉक!

सध्या भारत आणि चीनमध्ये सीमावादामुळे तणाव निर्माण झाला असून, नागरिक चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. याच पार्श्वभुमीवर आपल्या क्रिएटिव्ह कँपेनसाठी ओळखली जाणारी डेअरी प्रोडक्ट कंपनी अमूलने ट्विटरवर ‘एग्जिट द ड्रॅगन’ अशी पोस्ट केली होती. मात्र यामुळे ट्विटरकडून अमूलचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. मात्र काहीवेळातच हे अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

नेटिझन्स अमूलचे अकाउंट काही काळासाठी प्रतिबंधित करण्यासाठी एग्जिट द ड्रॅगन ही पोस्ट असल्याचे म्हणत आहेत. हे कँपेन चीनी वस्तूंच्या बहिष्काराच्या मागणीला सपोर्ट करण्यासाठी चालवण्यात आले होते. या पोस्टरमध्ये दिसत आहे की, आयकॉनिक अमूल गर्ल आपल्या देशाला ड्रॅगनशी लढून वाचवत आहे. ड्रॅगनच्या मागे टिकटॉक अ‍ॅपचा लोगो दिसत आहे. याशिवाय यात ‘मेड इन इंडिया’ देखील ठळक अक्षरात लिहिण्यात आलेले आहे.

ट्विटरवर अमूलचे अकाउंट उघडल्यावर हे ‘अकाउंट तात्पुरते प्रतिबंधित करण्यात आले आहे. असमान्य कार्यामुळे तुम्ही ही चेतावणी पाहत आहात. तुम्हाला आताही अकाउंट पाहायचे आहे का ?’ असा मेसेज दिसत आहे.

GCMMF चे मॅनेजिंग डायरेक्टर आर एस सोढी म्हणाले की, असे निर्बंध घालण्याआधी त्यांनी आम्हाला सांगितले का नाही. त्यांनी आम्हाला सुचना द्यायला हवी होती. अद्याप ट्विटरकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave a Comment