कार कंपनी होंडाची लोकप्रिय कार होंडा सिटीचे नवीन व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार असून, कोरोना व्हायरसमुळे याचे लाँचिंग टळले होते. नवीन होंडा सिटी 2020 मध्ये फोकस स्पेस, कंफर्ट, टेक्नोलॉजी आणि परफॉर्मेंसवर खास लक्ष देण्यात आलेले आहे. नवीन होंडा सिटी सध्या बाजारात असलेल्या मॉडेलपेक्षा वेगळी असेल.
येत आहे नवी होंडा सिटी, या असतील 5 खास गोष्टी
नवीन होंडा सिटी ड्युअल-टोन इंटेरियर आणि 3 स्पोक मल्टी-फंक्शन स्टेअरिंग व्हिलसोबत येईल. कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नेक्स्ट-जनरेशन होंडा कनेक्ट टेलीमॅटिक्स कंट्रोल यूनिट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये अॅलेक्सा रिमोट कॅपेबिलिटी देण्यात आली आहे. हे फीचर असणारे देशातील ही पहिलीच कार असेल.
सेफ्टी फीचर्समध्ये यात 6-एयरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एजल हँडलिंग असिस्टसोबत व्हिकल स्टॅबिलिटी कंट्रोल, आउट साइड रियर व्ह्यू मिररमध्ये लेनवॉच कॅमेरा आणि हिल स्टार्ट असिस्ट सारखे सेफ्टी फीचर्स मिळतील. नवीन होंडा सिटी व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स या तीन व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे.

कारमध्ये 1.5 लीट पेट्रोल आणि डिझेल इंजिन मिळेल. नवीन सिटीमध्ये डिझेल-ऑटोमॅटिक व्हेरियंट देखील मिळेल, ज्यात सीव्हीटी गियरबॉक्सचा पर्याय असेल. कारमध्ये 1498cc चे नवीन पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 121hp पॉवर आणि 150Nm टॉर्क जनरेट करते.
किंमतीबद्दल सांगायचे तर कारची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र याची किंमत 10.4 लाख ते 14.8 लाख रुपये असू शकते.