फोटो गॅलरी; शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही क्षणचित्रे


आजच्या दिवशी म्हणजे 6 जून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 347 वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पडला. 6 जून रोजी रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी जमते. शिवराज्याभिषेक सोहळा अगदी जल्लोषात साजरा केला जातो. पण यंदा कोरोनामुळे रायगडावर जाऊन शिवराज्याभिषेकाचा आनंद शिवभक्तांना अनुभवता आला नाही. तसेच घरी राहूनच शिवराज्याभिषेक दिन साजरा करा, असे आवाहन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून केले होते.

कोरोनाच्या सावटामुळे शिवभक्तांना रायगडावर जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवता आला नसला तरी नाराज होण्याचे कारण नाही. कारण रायगडावर 6 जून 2020 रोजी पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काही खास फोटोज समोर आले आहेत. या फोटोजच्या माध्यमातून शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेता येईल.


(सर्व फोटो साभार – @YuvrajSambhaji)

Leave a Comment