काही दिवसांपुर्वी अभिनेता रोहित रॉयने सुपरस्टार रजनीकांत आणि कोरोना संदर्भात इंस्टाग्राम पोस्टमध्ये विनोद शेअर केला होता. मात्र आता रोहित रॉयला हा विनोद करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. रॉयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘रजनीकांत हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, मात्र आता कोरोनालाच क्वारंटाईन करण्यात आले आहे.’ नंतर रॉयने हा एक ‘रजनी जोक’ असल्याचे म्हणत स्पष्टीकरण देखील दिले. मात्र सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांना अशा प्रकारचा जोक करणे आवडले नाही व त्यांनी रॉयला ट्रोल करण्यास सुरूवात केली.
रजनीकांत आणि कोरोना जुळविणे या अभिनेत्याला पडले महागात, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
अनेक युजर्सनी हा खूपच खराब विनोद असल्याच्या कमेंट्स केल्या. तर काहीजणांनी जर हा विनोद असेल तर नक्कीच तुझी आवड खराब आहे, असे म्हटले.

नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर रॉयने पोस्टमध्ये कमेंट करत स्पष्टीकरण दिले की, ‘मित्रोंना एवढे चिडू नका. विनोद हा विनोद असतो. माफ करा, पण माझी आवड खराब नाही. हा एक सर्वसाधारण रजनी सर विनोद आहे व माझा उद्देश केवळ तुम्हाला हसवण्याचा होता. कमेंट करण्याआधी त्यामागील उद्देश बघा. कमीत कमी ज्याप्रमाणे तुम्ही मला दुखावणाऱ्या कमेंट्स करत आहेत, त्या प्रमाणे तरी मी तुम्हाला त्रास होईल असा विनोद केलेला नाही.’