श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बाळाचा जन्म झाल्यास रेल्वेकडून मिळणार खास भेट

देशात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांसाठी सरकारने श्रमिक स्पेशल रेल्वे सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वे आता या ट्रेनमध्ये जन्मलेल्या बाळांना खास भेट देणार आहे. देशभरातून श्रमिक ट्रेनमधून प्रवास करताना बाळाला जन्म दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रेल्वे आता या बाळांना विशेष गिफ्ट देणार आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वेच्या कक्षेत येणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये तीन बाळांचा जन्म झाला आहे. तिन्ही बाळं आणि त्यांच्या आईंना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिन्ही बाळांचा जन्म ओडिशाच्या बालनगीर जिल्ह्यात झाला आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वेचे जनरल मॅनेजर विद्याभूषण यांनी घोषणा केली की, ईस्ट कोस्ट भागात श्रमिक रेल्वेमध्ये जन्मणाऱ्या बाळांना भेट म्हणून गिफ्ट कूपन दिले जाईल. या अंतर्गत या तिन्ही बाळांच्या आई-वडिलांना भेट म्हणून 5-5 हजार रुपये देखील दिले. रेल्वेमध्ये जन्मलेल्या बाळांना अधिकारी सरकारी नाही तर स्वतःच्या खर्चाने भेट देणार आहेत.

Leave a Comment