धक्कादायक ! हत्तीणीनंतर आता हिमाचलमध्ये अमानवीय कृत्य, गर्भवती गाय स्फोटकांमुळे जखमी

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा फटाके असलेले अननस खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना चर्चेत असताना आता कथितरित्या हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील झांडुता भागात शेतात चरत असणाऱ्या गर्भवती गायीच्या तोंडात स्फोटक फुटल्याने तिच्या जबड्याला इजा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गायीचे मालक गुर्दियाल सिंह यांनी अधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सिंह यांनी  या कृत्यासाठी आपला शेजारी नंदलालवर आरोप केला आहे. नंदलाल यांनी गायीला स्फोटक खायला घातले असून, या घटनेनंतर नंदलाल पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गायीच्या जबड्यातून रक्त वाहत आहे व यामुळे तिला पुढील काही दिवस अन्न देखील खाता येणार नाही.

ही घटना 10 दिवसांपुर्वी घडली असून, पोलिसांनी तक्रार दाखल करत या संदर्भात तपास सुरू केला आहे.

Leave a Comment