या महिन्यात पुन्हा होऊ शकते टोळधाड, संयुक्त राष्ट्राने दिली चेतावणी

सध्या भारतातील अनेक राज्ये टोळधाड संकटाचा सामना करत आहे. मात्र जुलै महिन्यात पुन्हा एकदा भारताला या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषि संघटनेने (एफएओ) याबाबत चेतावणी दिली आहे. केंद्र सरकारने टोळधाडीपासून 16 राज्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

Image Credited – sciencemag

एफएओने म्हटले की, पावसाळ्या आधी मे महिन्यात दक्षिण-पश्चिम पाकिस्तानामधून राजस्थानमध्ये टोळनी आक्रमण केले. 1962 नंतर पहिल्यांदा टोळ किटकांनी उत्तरेकडील राज्यात प्रवेश केला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला अंडी देण्यासाठी टोळ राजस्थानच्या वाळवंटात परतण्याआधी पुर्व आणि पश्चिमेकडे येतील. जून महिन्यात दक्षिण इराणमधून टोळ किटकांचा भारतात प्रवेश होईल. यानंतर जुलै महिन्यात हॉर्न ऑफ आफ्रिकेकडून टोळ भारतात येतील.

Image Credited – BBC

संघटनेनुसार, पुर्व आफ्रिका, उत्तर-पश्चिम केनियामध्ये या किटकांनी अंडी देण्यास सुरूवात केली असून, जुलै महिन्यात हे अपरिपक्व टोळसह भारतात येतील. अशीच स्थिती सोमालिया आणि इथियोपियामध्ये आहे. उत्तर-पुर्व सोमालियापर्यंत येणारे टोळ उत्तर हिंद महासागरात भारत-पाकिस्तान सीमा क्षेत्राकडे वळू शकतात.

Leave a Comment