फोटो ट्रांसफर करण्यासाठी फेसबुकने आणले खास टूल

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या डेस्कटॉप आणि मोबाईल युजर्ससाठी फोटो ट्रांसफर टूल लाँच केले आहे. युजर्स या टूलच्या मदतीने आपल्या फोटो आणि व्हिडीओला थेट गुगल फोटोवर ट्रांसफर करू शकतील. या नवीन टूलसाठी फेसबुकने गुगल फोटोसोबत भागीदारी केली आहे. कंपनी दुसऱ्या कंपन्यांसोबत देखील भागीदारी करण्याची शक्यता आहे.

Image Credited – XDA Developers

या टूलचा वापर करण्यासाठी युजर्सला या अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. सेटिंग्समध्ये युजर्सला फेसबुक इंफॉर्मेशन सर्च करावे लागेल. येथे युजर्सला ट्रांसफर कॉपी ऑफ योर फोटो आणि व्हिडीओचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर युजर्सला व्हेरिफिकेशनसाठी फेसबुक अकाउंटचा पासवर्ड टाकावा लागेल.

व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर युजर्स ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये फोटो आणि व्हिडीओ निवडून गुगल फोटोमध्ये पाठवू शकतील. फोटो ट्रांसफर झाल्यानंतर युजर्सला फेसबुककडून ईमेलद्वारे नॉटिफिकेशन मिळेल.

Leave a Comment