वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप खासदार मनेका गांधींविरुद्ध गुन्हा दाखल


नवी दिल्ली – गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर भाजपच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केरळमधील मल्लापुरम जिल्ह्याविषयी अपमानस्पद आणि तिरस्कार निर्माण करणारे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यवरुन आता केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एका वकिलाने मनेका गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार गुरूवारी मल्लापुरम येथील वकील सुभाष चंद्रन यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी व इतरांविरोधात त्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. वकील सुभाष चंद्रन यांनी आपल्या तक्रारीत मल्लापुरम जिल्ह्याच्या विरोधात द्वेषातून बदनामी करण्याची मोहीम चालवली जात असून जिल्ह्याविरोधात आणि जिल्ह्यातील रहिवाशांविरोधात मनेका गांधी यांनी खोटे आणि शुल्लक आरोप केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून मनेका गांधी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनेका गांधी गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर म्हणाल्या होत्या की, ही हत्या आहे. अशा घटनांसाठी मल्लापुरम प्रसिद्ध आहे. देशातील हे सर्वात हिंसक राज्य आहे. येथे लोक रस्त्यावर विष फेकतात. ज्यामुळे एकाच वेळी ३०० ते ४०० पक्षी व कुत्री मारली जावी. केरळमध्ये दर तिसऱ्या दिवशी एका हत्तीला मारले जाते. मल्लपुरम प्रकरणात केरळ सरकारने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही, असे वाटते की ते घाबरले आहेत.

Leave a Comment