मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांचे सरकार लॉकडाऊनमध्ये वीजेचे बिल कमी केले असल्याचा दावा करत आहे. जाहिरातींमध्ये देण्यात येत आहेत की ग्राहकांना केवळ 50-100 रुपये बिल पाठवले जात आहे. मात्र सरकारचे कर्मचारीच या योजनेवर पाणी फिरवत आहेत. मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथील एका व्यक्तीला एका महिन्याचे जे बिल पाठवले आहेत, त्यातील रक्कम एवढी मोठी आहे की ग्राहकांसाठी शून्य मोजणे अवघड आहे.
वीज विभागाचा कारनामा, या बिलातील शून्य मोजताना होईल तुमची दमछाक

सिंगरौली जिल्ह्यातील बैढन विद्युत वितरण केंद्राने सेवानिवृत्त शिक्षक राम तिवारी यांनी तब्बल 80 हजार अब्ज रुपयांचे वीज बिल पाठवले आहे. वीजेची रक्कम एवढी आहे की आपली सर्व संपत्ती विकून देखील ग्राहक ते भरू शकत नाही. एवढ्या मोठ्या रक्कमेचे बिल मिळाल्याने ग्राहक चिंतेत असून, विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत न्याय देण्याची मागणी करत आहेत.
सोशल मीडियावर लोक विभागाच्या बेजबाबदारपणाची खिल्ली उडवत आहेत व एवढे बिल तर संपुर्ण भागाचे देखील नसेल, असे म्हणत आहेत. अद्याप अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.