जॉर्ज फ्लॉयडच्या सन्मानार्थ व्हॉईट हाऊसजवळील रस्त्याला दिले ‘Black Lives Matter Plaza’ नाव

कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत निदर्शन सुरू आहेत. आता याच पार्श्वभुमीवर वॉशिंग्टनचे महापौर मुरियल बॉसर यांनी व्हाईट हाऊसजवळील एका रस्त्याचे नाव बदलून ‘ब्लॅक लाईव्हस मॅटर प्लाझा’ असे नामकरण केले आहे.  मागील काही दिवस हा रस्ता निदर्शकांचे प्रमुख केंद्र बनले होते.

अमेरिकी-आफ्रिकन महापौर मुरियल बॉसर यांनी यावेळी निदर्शकांचे समर्थन तर केले. सोबतच ते अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचे समर्थक देखील आहेत. या रस्त्यावर मोठमोठ्या अक्षरात पिवळ्या रंगाच्या पेंटने ब्लॅक लाईव्हस मॅटर प्लाझा लिहिण्यात आले आहे.

मुरियल बॉसर यांनी सांगितले की, एच आणि के च्या मधील 16व्या स्ट्रीटचे नाव बदलून ब्लॅक लाईव्हस मॅटर प्लाझा नाव देण्यात आले आहे. सोबतच या नावाची पाटी देखील लावण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट देखील केले.

Leave a Comment