वर्ण-समानता लढ्यासाठी हा खेळाडू देणार 750 कोटी

दिग्गज बास्केबॉलपटू मायकल जॉर्डनने वर्ण समानतेच्या लढ्यासाठी 100 मिलियन डॉलर्स (जवळपास 755 कोटी रुपये) देणार असल्याची घोषणा केली आहे. मायकल जॉर्डन आणि त्याचा ब्रँड ‘जॉर्डन’ पुढील 10 वर्ष वर्ण समानतेसाठी हा निधी देणार आहेत.

जॉर्डन यांनी म्हटले की, ब्लॅक लाईव्हस मॅटर हे काही विवादास्पद वक्तव्य नाही. जोपर्यंत आपल्या देशातील संस्था वर्णभेदाला संपुर्णपणे नष्ट करत नाहीत. तोपर्यंत आम्ही कृष्णवर्णीय व्यक्तींच्या आयुष्याला अधिक चांगले बनवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षा देण्यासाठी समर्थन देऊ.

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह जगभरात वर्ण समानतेच्या लढ्याने जोर पकडला आहे. फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत निदर्शन सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जॉर्डनने मदत निधीची घोषणा केली आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉन, गुगल सारख्या टेक कंपन्यांनी देखील वर्णभेद विरोधी लढ्यासाठी कोट्यावधींचा मदत निधी दिला आहे.

Leave a Comment