खराब दर्जाचे मास्क पाठवणाऱ्या चीनी कंपनीला अमेरिकेने ठोठावला दंड

अमेरिकेला खराब दर्जाचे मास्क पाठवल्याने एका चीनी कंपनीला अमेरिकन न्याय विभागाने दंड ठोठावला आहे. चीनच्या किंग ईयर पॅकेजिंग अँड प्रिटिंग कंपनी लिमिटेडला अमेरिकेच्या अन्न औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. कंपनीला तीन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. कंपनीला प्रत्येक प्रकरणात 5 लाख डॉलरचा दंड लावला आहे. या कंपनीवर एन-95 मानकाचा दावा करत खराब दर्जेचे मास्क पाठवल्याचा आरोप आहे.

कंपनीने 6 ते 21 एप्रिल दरम्यान 495,200 खराब दर्जाच्या मास्कची निर्मिती केली. यानंतर एन-95 रेस्पिरेटर असल्याचा दावा केला. हे खराब दर्जाचे मास्क कंपनीने अमेरिकेला आयात केले व याच्या पॅकेजिंगवर NIOSH आणि एफडीएचा शिक्का मारला. मात्र मास्कला NIOSH आणि एफडीएकडून मंजूरी मिळालेली नव्हती. कंपनीने खोटे कागदपत्रे सादर केले.

एफडीएने म्हटले आहे की जे अमेरिकन नागरिकांच्या आरोग्याला धोक्यात टाकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान, भारताने देखील या आधी चीनी कंपन्यांवर खराब दर्जाचे मास्क पाठवल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment