निसर्ग वादळाचा सलमानच्या फार्म हाउसला तडाखा

फोटो साभार नवभारत टाईम्स

बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीला तडाखा देणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाने पनवेल येथे असलेल्या सलमान खान याच्या फार्म हाउसचे मोठे नुकसान केल्याचे समजते. भाईजानची गर्लफ्रेंड युलिया वान्तूर हिने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर वादळाने पडलेल्या झाडांचे फोटो शेअर केले आहेत. त्याचा व्हिडीओ ही शेअर केला आहे. त्यात वादळापूर्वीचे फार्म हाउस आणि वादळानंतरचे फार्म हाउस दिसत आहे.

सलमान लॉक डाऊन लागल्यापासून याच फार्म हाउसवर आहे आणि त्याची मैत्रीण युलिया तसेच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सुद्धा येथेच आहे. सलमान त्याच्या कुटुंबापासून दूर असला तरी तो त्याचे अपडेट सोशल मीडियावर सातत्याने देत आहे. या काळात त्याने तीन व्हिडीओ रिलीज केले असून करोना ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

सलमानने नुकतेच पर्सनल केअर ब्रांड एफआरएसएच लाँच केला आहे. त्याने त्याअंतर्गत १ ;लाख हँड सॅनीटायझर मुंबई पोलिसांना वाटले आहेत. सलमानचा आगामी राधे चित्रपट पूर्ण झाला आहे मात्र लॉक डाऊन मुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे.

Leave a Comment