भज्जीचा अभिनय क्षेत्रात प्रवेश, फिल्म पोस्टर रिलीज

फोटो साभार न्यूज १८

टीम इंडियाचा जेष्ठ स्पिनर हरभजनसिंग उर्फ भज्जी आता नव्या मैदानात उतरला असून त्याने चित्रपटात अभिनेता म्हणून नवीन क्षेत्र निवडले आहे. गेली चार वर्षे टीम इंडिया मध्ये वापसी होईल म्हणून त्याने प्रतीक्षा केली असली तरी त्यापूर्वीच त्याने त्याच्या प्लॅन बी वर काम सुरु केले होते. भज्जी तमिळ फिल्म फ्रेंडशिप मधून चित्रपट सृष्टी मध्ये डेब्यू करतो आहे. हा चित्रपट पूर्ण झाला असून परिस्थिती नॉर्मल झाली तर तो ऑगस्ट मध्ये रिलीज केला जाणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर भज्जीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सूर्य यांनी केले असून भज्जी यात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन सह प्रमुख भूमिकेत आहे.

हरभजनसिंग याने टीम इंडियासाठी शेवटचा टी २० सामना २०१६ मध्ये खेळाला होता. हा ३९ वर्षीय खेळाडू  गेला काही काळ टीम इंडियाच्या निळ्या वा पांढऱ्या जर्सीत दिसला नसला तरी आयपीएल चेन्नई सुपर किंग्स मध्ये खेळतो आहे. यंदाच्या आयपीएल मध्येही तो याच संघात होता पण करोना मुळे ही स्पर्धा अनिश्चित कालपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.

Leave a Comment