करोना लसीचे २ अब्ज डोस पुण्याच्या सिरम संस्थेत बनणार

फोटो साभार झी न्यूज

जगभर करोना लसीवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु असतानाच पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करोना लसीचे २ अब्ज डोस उत्पादित केले जाणार आहेत. संस्थेचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनची फार्मा कंपनी अॅस्ट्राझेनेकाने यासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूट आणि बिल गेट्स स्पॉन्सर्ड एका स्वयंसेवी संस्थेशी करार केला आहे. त्या अंतर्गत हे २ अब्ज डोस उत्पादित केले जात असून हे उत्पादन पुण्यातच होणार आहे.

या संदर्भात ४ जून रोजी अॅस्ट्राझेनेकाने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी सिरम इन्स्टिट्यूट बरोबर करार केला गेल्याचे म्हटले आहे. यात कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्न गटातील देशात संभावित करोना लसीचे १ अब्ज डोस पुरविले जाणार आहेत. याच कंपनीने ब्रिटन आणि अमेरिका याना लस पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.

अदर पूनावाला यांनी अॅस्ट्राझेनेका बरोबर भागीदारी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून संस्थेने गेल्या ५० वर्षात वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम केल्याचा नमूद केले आहे. ते म्हणाले आमच्या संस्थेने उत्पादन आणि पुरवठा यात चांगली कामगिरी नेहमीच बजावली असून सर्व उत्पन्न गटाना कोणताही भेदभाव न करता लस पुरवठा केला आहे.

जगात करोना संक्रमितांची संख्या ६५ लाखाहून अधिक झाली आहे. भारतात दोन महिने लॉकडाऊन करूनही रुग्ण संख्या वाढते आहे असे दिसून आले आहे.

Leave a Comment