केव्हापासून झाली जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची प्रथा?


जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जूनला साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश्य आहे. मनुष्य आणि पर्यावरणाचे अतूट नाते आहे. मनुष्य जीवन निसर्गाशिवाय शक्य नाही. पण सध्याच्या घडीला माणूसच आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचे नुकसान करत आहे. अनेक ठिकाणी सर्रास वृक्षतोड होत आहे, समुद्र-नद्या प्रदूषित होत आहेत. जागतिक पर्यावरण दिवस 1972 पासून साजरा करण्यात येत आहे. 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्राने जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.

जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची दरवर्षी थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे हा दिवस यावेळी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. कारखाने, वाहनांची वाहतूक यासह सगळ्याच गोष्टी लॉकडाऊनमुळे बंद असल्याने प्रदूषण आपोआपच काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिवस मागील वर्षांपेक्षा वेगळा असेल. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 2020 ची थीम ‘वेळ आणि निसर्ग’ अशी आहे.

आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचे जीवन पर्यावरणामुळेच शक्य आहे. या दिवसामागील पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा उद्देश्य आहे. पर्यावरणाप्रति लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

Leave a Comment