एकाच वेळी 25 शाळेत शिकवत होती ही शिक्षिका, केली 1 कोटींची कमाई, आता होणार चौकशी

उत्तर प्रदेशच्या बेसिक शिक्षा विभागांतर्गत येणाऱ्या कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये कार्यरत एका शिक्षिकेने 1 कोटी रुपये पगार मिळवला आहे. शिक्षिका एकसह 25 शाळेत नोकरी करत पगार मिळवत होती. हा प्रकार समोर आल्यानंतर विभागाने शिक्षकांचा डेटाबेस बनवण्यास सुरूवात केली. आता विभागाने या पुर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

बेसिक शिक्षा विभागानुसार, आता शिक्षकांचा डिजिटल डेटाबेस बनवला जात आहे. या प्रक्रियेदरम्यान कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये पुर्णवेळ काम करणारी शिक्षिका अमेठी, आंबेडकर नगर, रायबरेली, प्रयागराज, अलीगढ आणि अन्य जिल्ह्यात एकावचवेळी 25 शाळेमध्ये काम करत असल्याचे आढळले.

एक डिजिटल डेटाबेस असताना देखील शिक्षिकेने फेब्रुवारीपर्यंत फसवणूक करून विभागाकडून पगार मिळवला. शिक्षिकेने 13 महिन्यात 1 कोटी रुपये वेतन मिळवले. विभागानुसार, अनामिका शुक्ला नावाची महिला शिक्षिका 25 शाळांमध्ये काम करत होती. त्या मुळ मैनपुरी जिल्ह्याच्या आहेत.

विभागाने शिक्षिकेला नोटीस पाठवले आहे, मात्र शिक्षिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या शिक्षिकेचे वेतन थांबवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे बेसिक शिक्षा मंत्री डॉ. सतीश द्विवेदी यांनी आरोप सत्य निघाल्यास कारवाई केली जाई असे म्हटले आहे.

Leave a Comment