व्हाईट हाऊस बाहेर निदर्शकांवर केलेल्या कारवाईमुळे ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अमेरिकन नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हाईट हाऊस समोर प्रदर्शन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा दलांना अश्रुधुराचे गोळे आणि स्मोक बॉम्ब सोडले होते. यानंतर ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ट्रम्प व्हाईट हाऊसजवळील एका चर्चसमोर बायबलसोबत फोटो काढण्यात जात होते. यावेळी ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या निदर्शकांनी तेथे गर्दी केली. या निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली होती.

अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज यूनियन आणि इतर संघटनांनी म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प आणि अधिकाऱ्यांनी निदर्शकांच्या घटनात्मक अधिकारांचे हनन केले आहे. पोलिसांनी निदर्शकांवर सामुहिकरित्या अचानक हल्ला केला आणि या दरम्यान त्यांनी केमिकल, रबर बुलेट्स आणि साउंड केनन सारख्या गोष्टींचा वापर केला.

यूनियनचे लीगल डायरेक्टर स्कॉट मिशेलमेन म्हणाले की, राष्ट्रपतींना निदर्शकांचे विचार पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी अशी कारवाई करणे दर्शवते की हे आमच्या संविधानाचे किती मोठे उल्लंघन आहे.

दरम्यान, अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला असून, तोडफोड-चोरीच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Comment