आश्चर्यच ! तब्बल 26 वर्षांनंतर वरती आले पाण्यात बुडालेले हे गाव

इटलीचे एक गाव जवळपास 26 वर्षानंतर सरोवरमधून बाहेर आले आहे. आता इटली सरकारला आशा आहे की पुढील काही महिन्यात हे मध्यकालीन ऐतिहासिक गाव पर्यटकांना पाहण्यासाठी सुरू उघडता येईल. हे गाव मागील 73 वर्षांपासून सरोवरमध्ये बुडालेले होते. काही लोकांचे म्हणणे आहे की गावात वाईट शक्ती, भूत राहत असे त्यामुळे गाव बुडाले.

Image Credited – Daily Mirror

या गावाचे नाव फॅब्रिश डी कॅरीन आहे. हे गाव 1947 पासून वागली सरोवरमध्ये बुडालेले आहे. 73 वर्षांपासून पाण्यात असणारे हे गाव केवळ 1958, 1974, 1983 आणि 1994 या वर्षातच दिसले आहे. आता 26 वर्षांनी सरोवरचे पाणी कमी झाल्याने गाव पुन्हा दिसू लागले आहे. हे गाव 13व्या शतकात वसले असल्याचे सांगितले जाते. या गावात लोहाचे उत्पादन होत असे.

Image Credited – Aajtak

इटलीच्या लूका प्रांतातील टसकॅनी शहरातील या गावाला पाहण्याची संधी 26 वर्षांनी आली आहे. हे गाव नेहमी 34 मिलियन क्यूबिक मीटर पाण्यात बुडालेले असते. 1947 साली या गावावरीत धरण बांधण्यात आले होते. धरणाचे काम पाहणारी कंपनी इनेलने सांगितले की, आम्ही हळूहळू सरोवराचे पाणी कमी करत आहोत. जेणेकरून साफ-सफाई करता येईल. पुढील वर्षीपर्यंत काम पुर्ण होईल.

Image Credited – Aajtak

1947 मध्ये येथे धरण बांधल्यानंतर गावकऱ्यांना जवळील वागली डी सोटो येथे पुर्नस्थापित करण्यात आले. या गावात चर्च, सिमेट्री आणि दगडांनी बांधलेले घरे आहेत. येथे पाणी कमी झाल्यावर लोक गावात आत जाऊन फिरतात देखील. इनेल कंपनीने सांगितले की, सरोवर रिकामे करून गाव पुन्हा उघडले जाईल. जेणेकरून पर्यटन वाढेल. सोबत जुन्या धरणाची दुरुस्ती करता येईल.

Leave a Comment