UAEने चक्क वाळवंटात घेतले ७६३ किलो बासमती तांदळाचे उत्पादन


शारजा – शारजा येथील शेतजमीनीवर बासमती तांदळाचे पीक घेण्यात संयुक्त अरब अमिरातीमधील संशोधकांना (युएई) यश आले आहे. युएईमधील भविष्यामधील अन्नधान्य निर्मितीसंबंधातील क्षेत्रासाठी या यशस्वी प्रयोगानंतर हे महत्वाचे पाऊल असून अशाप्रकारे देशाबरोबरच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पीक उत्पादन घेण्यासंदर्भातील महत्वाचे निर्णय घेतले जातील असे तेथील हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. युएईने वाळवंटामध्ये पीक घेत तांदूळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल टाकले आहे.

गल्फ न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अल धयाद येथील संशोधन केंद्राच्या मदतीने देशामध्ये पहिल्यांदाच तांदूळ उत्पादन घेण्याचा हा प्रयोग राबवण्यात आला. तांदळाचे बियाणे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये पेरण्यात आले होते. पिकांनी १८० दिवसाचा काळ तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या या उत्पादनामध्ये नुकताच पूर्ण केला.

धान्याचे बी या वाळवंटात कसा प्रतिसाद देते यासंदर्भातील निरिक्षण करणे, त्याचबरोबर त्यावर देखरेख ठेवणे आणि त्यासंदर्भातील नोंदणी सुलभ करण्यासाठी पीक ज्या भागामध्ये घेण्यात आले त्याचे तीन तुकड्यांमध्ये विभाजन केले गेले. पाच मे रोजी पहिला तुकड्यातील तांदूळ, १० मे दुसऱ्या तुकड्यातील रोजी आणि ३० मे रोजी तिसऱ्या तुकड्यातील काढण्यात आला. या प्रयोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या उत्पादनाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ७६३ किलो तांदळाचे एक हजार चौरस मीटर (१० हजार ७६४ स्वेअर फूट) परिसरामध्ये उत्पादन घेण्यात आले.

मंत्रालयाने असेमी (जपोनिका) प्रजातीच्या तांदाळाचे पीक घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. चीन, जपान आणि कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात या तांदळाचे उत्पादन घेतले जाते. एफएल ४७८ नावाने लांब दाण्याच्या हा तांदळाचा वाण ओळखला जातो. या तांदळालाच बासमती म्हणून भारतात ओळखले जाते.

तांदळातील दोन वाणांची उष्णता, खारटपणा आणि मातीची कमतरता सहन करण्याच्या क्षमतेमुळे प्रकल्पावर काम करणाऱ्या तज्ञांनी निवड केल्याची माहिती हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयाने दिली. संशोधकांनी पाणीटंचाईच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तसेच पिकांसाठी लागणारा खर्च व पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी भूमिगत ठिबक सिंचन यंत्रणेच्या माध्यमातून हे पीक घेतले. त्याठिकाणी पीक घेण्यात यश आले असले तरी दर्जासंदर्भातील चाचण्या केल्यानंतरच हा व्यवसायिक वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वाळवंटामध्ये बासमतीचे पिकं घेण्याचा चमत्कार कोरिया आणि युएईमधील संशोधकांनी एकत्रितपणे काम करुन दाखवल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे.

Leave a Comment