सलाम! बाळला दूध देण्यासाठी धावत्या रेल्वे मागे धावला जवान, रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केला पुरस्कार

श्रमिक रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या एका 4 महिन्याच्या बाळाला दूध देण्यासाठी रेल्वेमागे धावणाऱ्या एका आरपीएफ जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना इंदर सिंह यादव यांचे कौतुक करत रोख पुरस्कार जाहीर केला आहे.

इंदर सिंह यादव हे प्रवाशांना सुचना देत असतानाच बेळगाव-गोरखपूर श्रमिक रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने त्यांच्याकडे दुधाची मागणी केली. भोपाळ स्टेनवरील प्लॅटफॉर्मवर रेल्वे येताच, साफिया हाश्मी यांनी आपल्या 4 महिन्यांच्या बाळासाठी दूध मागितले. त्यांनी सांगितले की, बाळासाठी बेळगावपासून दुधाची मागणी करत आहे, मात्र मिळाले नाही. या विनंतीनंतर यादव हे त्वरित रेल्वे स्टेशनबाहेर दूध आणण्यासाठीधावले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, जवान एका हातात सर्व्हिस रायफल आणि दुसऱ्या हातात दुधाचे पाकिट घेऊन बाळापर्यंत दूध पोहचविण्यासाठी धावत्या रेल्वेमागे धावत आहेत. यादव म्हणाले की, मला याबाबत विश्वास होता व कधीही वाटले नाही की मी त्यांच्यापर्यंत दूध पोहचवू शकणार नाही.

व्हिडीओ व्हायरस झाल्यानंतर पीयुष गोयल यांनी देखील जवानाचे कौतूक करत रोख पुरस्काराची घोषणा केली आहे. बाळाच्या आईने देखील यादव यांचे आभार मानत त्यांना खरे हिरो म्हटले आहे.

Leave a Comment