सोनू सूदच्या भेटीला रोहित पवार


स्थलांतरित मजुरांसाठी अहोरात्र गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद काम करत आहे. सोनू सूदचे प्रत्येक मजूर त्यांच्या गावी सुखरुप पोहोचावा यासाठी प्रयत्न सुरु असल्यामुळे सर्वच स्तरांमधून त्याच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही सोनू सूदचे कौतुक करत त्याची भेट घेतली आहे.

ट्विटरवर रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सोनू सूदची भेट घेतल्याचे म्हटले आहे. ‘घर जाना हैं’, हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या @SonuSood यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.


दरम्यान, आतापर्यंत विविध मार्गाने सोनू सूदने गरजुंची मदत केली आहे. त्याने मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी बसची सेवा सुरु केली होती. तसेच त्याने रमजानच्या महिन्यात अनेकांना जेवण उपलब्ध करुन दिले होते. त्याचबरोबर एवढ्यावरच न थांबता त्याचे हॉटेल्सदेखील त्याने डॉक्टर, पोलिसांसाठी खुले केल्यामुळे सोनूच्या कार्याची सामान्य जनतेपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी दखल घेतली आहे. पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद त्यामुळे आता खऱ्या आयुष्यात नायक ठरला आहे.

Leave a Comment