या प्राण्यांना खाजगी विमानाने दिल्लीहून मुंबईला आणण्यासाठी खर्च करणार 9 लाख

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरापासून दूर अडकले होते. अशा स्थितीत त्यांचे पाळीव प्राणी सुद्धा त्यांच्यापासून लांब अडकले होते. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मालक आपल्या लाडक्या प्राण्यांना खास विमानाने परत आणत आहेत. असेच एक खाजगी चार्टेड जेट सहा प्राण्यांना घेऊन दिल्लीवरून मुंबईला उड्डाण घेणार आहे. उद्योजक आणि सायबर सिक्युरिटी रिसर्चर दीपिका सिंहने या प्राण्यांची आपल्या मालकांशी भेट घालून देण्याची योजना बनवली आहे.

25 वर्षीय दीपिका म्हणाली की, ती नातेवाईकांसाठी दिल्लीवरून विमानाची सोय करत होती. मात्र त्यांना प्राण्यांबरोबर प्रवास करायचा नव्हता. तेव्हा ऑल पेट खाजगी जेटची कल्पना सुचली. काहीजणांना प्राण्यांबरोबर प्रवास करायचा होता, मात्र काहीजणांनी नकार दिल्यानंतर अखेर या प्राण्यांसाठी आणखी एका विमानाची सोय करण्याचे ठरवले.

दीपिकाने या सहा प्राण्यांसाठी खाजगी जेट पुरवणारी कंपनी एस्सेरेशन एव्हिशनशी संपर्क साधला असून, या प्रवासासाठीचा एकूण खर्च 9.06 लाख रुपये आहे. प्रत्येक सीटसाठी 1.6 लाख रुपये खर्च येईल. आतापर्यंत 4 जण आपल्या प्राण्यांना दिल्लीवरून मुंबईला आणण्यास तयार झाले आहेत. यामध्ये दोन शिह जू, एक गोल्डन रिट्राईव्ह कुत्रा आणि एका तीतर पक्षी आहे.

Leave a Comment