गुगल प्ले स्टोरवर झाली ‘मित्रों’ अ‍ॅपची वापसी

खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळालेल्या शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप मित्रोंची गुगल प्ले स्टोरवर वापसी झाली आहे. मित्रों अ‍ॅपला कंटेट पॉलिसीचे उल्लंघन होत असल्याने गुगलने प्ले स्टोरवरून हटवले होते. ज्यावेळी मित्रों अ‍ॅपला प्ले स्टोवरून हटवले होते, त्यावेळी अ‍ॅपची कोणतीही प्रायव्हेसी पॉलिसी नव्हती. मात्र आता अ‍ॅप अपडेट करत यात प्रायव्हेसी पॉलिसीचा समावेश करण्यात आला आहे.

चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देणारे हे अ‍ॅप प्ले स्टोरवरील माहितीनुसार बंगळुरूचे आहे. या अ‍ॅपचा इंटरफेस काही प्रमाणात टिकटॉक सारखाच आहे. मित्रों अ‍ॅपला प्ले स्टोरवरून आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. 2 जूनला हे अ‍ॅप प्ले स्टोरवरून हटवण्यात आले होते.

दरम्यान, हे अ‍ॅप कथितरित्या पाकिस्तानी डेव्हलपर कंपनी Qboxus ने तयार केल्याचे सांगितले जाते. कंपनीचे सीईओ इरफान शेख यांनी हा दावा केला आहे. पाकिस्तानी डेव्हलपर्सकडून केवळ 2500 रुपयांना हे अ‍ॅप करेदी करण्यात आले होते.

Leave a Comment